
मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रांतील तज्ञ तरुणांना नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन शासनासोबत काम करण्याची संधी मिळावी यासाठी ही फेलोशिप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

























































