… आणि त्याने थेट संरक्षणमंत्र्यांचाच ताफा अडवला, वाचा काय आहे प्रकरण

1295

हायप्रोफाईल व्यक्तींचा ताफा रोडवरून जात असताना चारही बाजूला सुरक्षारक्षकांची फौज उभी असते. अनेकदा वाहतूक रोखून हा ताफा पुढे जातो. त्यात जर तो ताफा देशाच्या संरक्षणमंत्र्यांचा असेल तर सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतो. मात्र दिल्लीमध्ये एका व्यक्तीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचाच ताफा रोखला. या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव विश्वर दास गुप्ता असून तो 35 वर्षाचा आहे. विश्वर मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर येथील रहिवासी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे अशीही प्राथमिक माहिती मिळाली असून ताब्यात घेतल्यानंतर त्याला पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी विश्वर संसद परिसरामध्ये असणाऱ्या एका रस्त्यावर झोपला. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची असल्याचा रट्टा लावला होता. आधार कार्डवरील नाव बदलून देण्यासाठी ही भेट घ्यायची असल्याचे त्याने सांगितले. याच दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा ताफा या रस्त्यावरून जाताना दिसला आणि विश्वरने त्याकडे धाव घेतली व ताफा अडवला. यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिकडे धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेतले. याचा व्हिडीओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या