रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांना फटका, अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास फक्त शंभर दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

जुलै महिना संपण्याची वेळ आली तरी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. सीबीएसईच्या निकालामुळे अकरावी प्रवेश रखडलेले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरअखेरपर्यंत कॉलेज सुरू झाल्यास अकरावीचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांच्या हातात जेमतेम 100 दिवसांचा कालावधी शिल्लक असणार आहे. नियमानुसार पहिली घटक चाचणी, सत्र परीक्षा, दुसरी घटक चाचणी आणि अंतिम परीक्षा घेणे कॉलेजना बंधनकारक आहे. मात्र अद्याप कॉलेजच सुरू न झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून पहिल्या सत्रातील परीक्षा कशा घ्यायच्या, असा प्रश्न शिक्षकांसमोर असणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी कॉलेज पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रवेश फेऱया सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतरच सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सुमारे 45 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे प्रवेश पूर्ण होऊन अकरावीचे वर्ग सुरू होण्यास सप्टेंबर महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा. मुपुंद आंधळकर यांनी सांगितले, सध्या अकरावीचे शिक्षक कॉलेजमध्ये बसून आहेत. विद्यार्थ्यांअभावी वर्ग रिकामे आहेत. दहावीच्या निकालानंतर 15 जुलैपर्यंत अकरावी प्रवेश पूर्ण होऊन कॉलेज सुरू होणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. हे दरवर्षीचे चित्र आहे. सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून बारावी परीक्षेकडे पाहता या विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहत आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱया नुकसानीला सर्वस्वी शिक्षण विभागच जबाबदार आहे.

अकरावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर सुट्टय़ांचा काळ

सप्टेंबरअखेरपर्यंत अकरावीचे वर्ग सुरू झाले तरी येणारा काळ हा सुट्टय़ांचा आहे. ऑक्टोबरमध्ये दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहे. त्यानंतर महिनाभर लेक्चर्स झाले की पुढे नाताळची सुट्टी, त्यानंतर कॉलेजमधील वार्षिक समारंभ, गॅदरिंग, डेज, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ सुरू होतील. हे कार्यक्रम संपणार तोच जानेवारी महिना उजाडेल. त्यानंतर बारावीच्या परीक्षांची तयारी सुरू होईल. कॉलेज स्तरावर पार पडणारी तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा आणि नंतर फेब्रुवारीमध्ये लेखी परीक्षांमुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असेल. या तीन महिन्यांत शिक्षकांना अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

पेंद्रीय बोर्डाच्या सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने एसएससी बोर्डाच्या लाखो विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान केले आहे. 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला. महिना लोटला तरी हे विद्यार्थी अद्याप घरातच बसून आहेत. कॉलेज सुरू नसल्याने बऱयाच विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासना प्रवेश घेतला असून अभ्यासाला सुरुवात केली आहे. कॉलेजमध्ये अभ्यासाचे फार कमी दिवस शिल्लक असल्याने घाईघाईत अभ्यास करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी क्लासेसचा आसरा घेतला आहे.

– प्रा. मुकुंद आंधळकर, सरचिटणीस, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

एनओसीअभावी शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त

ज्युनियर कॉलेजमधील शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. शिक्षण विभागाने नवीन नियुक्त्यांना परवानगी न दिल्याने सध्या मुख्य विषयांना शिक्षकच उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती बऱयाच कॉलेजमध्ये आहे. प्राचार्यांनी पद भरतीसाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविला असून विभागाकडून एनओसीच दिली जात नाही, असा आरोप कॉलेजमधून होत आहे.