क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपचा झेंडा हाती घेत देशसेवेसाठी राजकारणात आल्याची भावना बोलून दाखवली. गौतम नवी दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा त्याच्या पक्ष प्रवेशानंतर रंगली आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.