दिल्लीत स्फोटाचा कट उधळला, आयईडी केले जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांनी सीमापुरी भागातील एका घऱातून आयईडी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या आयईडीचा पोलिसांनी दिलशाद गार्डन ब्लॉकच्या डिस्ट्रिक्ट पार्कमध्ये आठ फूट खड़्ड्यात स्फोट घडवून आणला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

जानेवारी महिन्यात पोलिसांना दिल्लातील गाजीपूर फूल बाजारात आयईडी सापडले होते. त्या गाजीपूर प्रकरणाचा तपास करताना त्याचे धागेदोरे पोलिसांना सीमापूरी भागात आढळले. या ठिकाणी पोलिसांनी छापे मारले असता त्यांना एका बॅगमध्ये आय़ईडी आढळले. 29 जानेवारीला पोलिसांना हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये एका पार्किंगमधील गाडीत आरडीएक्सचा स्फोट झाला होता. पोलीस आता या सर्व घटनांचा संबंध जोडून तपास करत आहे.