ती पाहताच अॅनाबेला, आजोबांचा जीव गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

गेल्या महिन्यात 26 जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अॅनाबेला कम्स होम’ (Annabelle Comes Home) या भयपटाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचदरम्यान थायलंडमध्ये फिरायला आलेल्या एका 77 वर्षांच्या ब्रिटनच्या आजोबांचा हाच चित्रपट बघताना मृत्यू झाला आहे. बर्नाड चॅनिंग असे त्यांचे नाव आहे.

बर्नाड सुट्टया घालवण्यासाठी थायलंडमध्ये आले होते. सर्वत्र ‘अॅनाबेला कम्स होम’ चित्रपटाची चर्चा सुरू असल्याने त्यांनी हा चित्रपट पाहायचे ठरवले. चित्रपट पाहायला जाताना बर्नाड खुश होते. ते शांतपणे चित्रपटही पाहात होते. पण चित्रपट संपल्यानंतर ते जागेवरून उठले नाही. यामुळे महिलेने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बर्नाड यांना हृद्याशी संबंधित तक्रार असावी. यामुळे चित्रपटातील भयदृश्य बघताना त्यांचा रक्तदाब वाढला असावा त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असल्याची तक्रार नाकारता येत नाही . पण पोस्टमार्टेम केल्यावरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.