लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, संध्याकाळी दुसऱ्या महिलेशी केले लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रद्धा वालकर हत्याकांडाला तीन महिने झाले तरी दररोज नवनवीन खुलासे होत असतानाच आज पुन्हा एकदा दिल्ली एका तशाच हत्याकांडाने हादरली आहे. दिल्लीतील एका ढाब्यातील फ्रिजमध्ये मुलीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीची हत्या ही तिच्याच लिव्ह इन पार्टनरने केलेली असून त्याने तिची हत्या केल्याच्या संध्याकाळीच लग्न देखील केले.

निक्की ही तिचा बॉयफ्रेंड साहीलसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. साहीलचे दुसऱ्या महिलेसोबत लग्न ठरले होते. त्यावरूनच त्या दोघांमध्ये वाद झाले होते. त्यावरून निक्कीने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर साहीलने तिची हत्या करण्याचा प्लान केला. त्याने 10 फेब्रुवारीला रात्री उशीरा निक्कीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तो रात्रभर तो तिचा मृतदेह घेऊन फिरत राहिला. त्याचदरम्यान त्याला एका ढाब्याबाहेर बंद फ्रिज दिसला. त्या फ्रिजमध्ये त्याने तिचा मृतदेह ठेवला व तिथून पळ काढला.

साहीलने निक्कीची हत्या केल्यानंतर त्याच संध्याकाळी त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. मात्र निक्कीचा मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी तीन दिवसातच या घटनेचा छडा लावला व साहिलला अटक केली.