दिल्ली महापालिकेसाठी ‘आप’ आणि ‘भाजप’मध्ये जबरदस्त रस्सीखेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत सुरूवातीचे जे कल हाती आले आहेत त्यानुसार आप आणि भाजप यांच्या कांटे की टक्कर बघायला मिळते आहे. दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी मतदान झालं होतं, ज्यातील 247 जागांवरील कल स्पष्ट झाले आहेत. हे कल स्पष्ट होत असताना कधी भाजप पुढे गेलेली पाहायला मिळाला तर कधी आम आदमी पक्ष. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आपचे 124 उमेदवार हे आघाडीवर होते तर भाजपचे 118 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेसच्या पदरी यंदाही निराशाच पडताना दिसत असून काँग्रेसच्या वाट्याला 5 जागा येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.