Goa Politics भाजप-काँग्रेसची सत्तेसाठी धावपळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

सत्ता टिकवण्यासाठी भाजपची तर सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसची आज गोव्यात दिवसभर धावपळ सुरू होती. काँग्रेसने सकाळीच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा पुन्हा एकदा दावा केल्याने भाजपची तारांबळ उडाली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या.

गोवा विधानसभेत एकूण 40 सदस्य असून भाजपकडे 12 तर काँग्रेसकडे 14 संख्याबळ आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करण्याची संधी आम्हालाच मिळावी अशी मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विरोधी पक्षनेते चंद्रकांत केवळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि पत्र दिले. विशेष म्हणजे काँग्रेसची सत्ता स्थापण्याचे  राज्यपालांना पत्र देण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी त्यांनी शुक्रवारी आणि रविवारीही असाच दावा केला होता.