
संत ज्ञानेश्कर, संत तुकाराम, संत नामदेव आणि समर्थ रामदासांसारख्या प्रसिध्द संतांनी अभंग आणि कवितांच्या माध्यमातून जीवनाचे सार मांडले. संताची शिकवण जपणारा ‘बोलावा विठ्ठल’ हा संत साहित्याने नटलेला असाच कार्यक्रम आहे. हा सदाबहार कार्यक्रम येत्या २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वाशीतील सिडको आर्ट्स आणि एक्झिबिशन सेंटर येथे रंगणार आहे, असे पंचम निषादचे क्रिएटिव्ह संचालक शशी व्यास यांनी सांगितले.
यंदा हा दौरा १२ शहरांमध्ये असणार आहे. भोपाळमध्ये क़ार्यक्रमाला सुरुवात झाली असून त्यानंतर इंदूर, अहमदाबाद, बेंगळुरु, चेन्नई, मंगलोर नंतर नवी मुंबई, ठाण्यात होणार आहे. यात सुरेश वाडकर, अरुणा साईराम, देवकी पंडित, रंजनी-गायत्री, कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेकुंडी, आनंद भाटे, राहुल देशपांडे, रघुनंदन पणशीकर आणि अपर्णा केळकर अभंग सादर करणार आहेत.




























































