…तर ‘हा’ खेळाडू आज यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना खेळणार, आकाश चोप्राचे भाकीत

लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आज आयपीएल 2024 मधील 26 वा सामना खेळला जाणार आहे. या लढतीपूर्वी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी एक भाकीत वर्तवले आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू देवदत्त पडिक्कल याने धावा केल्या नाही तर तो आज अखेरचा सामना खेळेल असे आकाश चोप्राने म्हटले आहे.

देवदत्त पडिक्कल याच्या बॅटमधून यंदाच्या हंगामात धावा निघालेल्या नाहीत. पडिक्कल याने आतापर्यंत 4 लढती खेळल्या असून त्यात त्याला एकदाही दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. चार लढतीत त्याने 0, 9, 6 आणि 7 अशी खेळी केली आहे. विशेष म्हणजे लखनऊने यंदाच्या हंगामात लिलावाआधी पडिक्कल याला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड केले होते.

आकाश चोप्राने देवदत्त पडिक्कल याच्याबाबत भाकीत वर्तवताना म्हटले की, लखनऊमध्ये नवा चेंडू काटा बदलतो. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक नवा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतील, मात्र नंबर 3 वर येणारा पडिक्कल फॉर्मातही नाही. त्याने धावा केल्या नाहीत तर तो आज अखेरचा सामना खेळेल. त्याच्या जागी दिपक हुड्डा याला संधी मिळू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

दरम्यान, लखनऊच्या संघाने चारपैकी तीन लढती जिंकून आयपीएलमधील आपला दबादबा कायम ठेवला आहे. याउलट पंतच्या जबरदस्त कामगिरीनंतरही दिल्लीला पाचपैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ सध्या तळाला आहे. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत येण्यासाठी दिल्लीला आता प्रत्येक विजय महत्त्वाचा असेल. खराब गोलंदाजी दिल्लीची मुख्य डोकेदुखी ठरत आहे.