
ग्राहक मंत्रालयाने मास्क व हँड सॅनिटायझर या वस्तू अत्यावश्यक उत्पादनांच्या यादीत समाविष्ट केल्या आहेत. कोरोना व्हायरस संसर्गामुळे या दोन उत्पादकांना पुरवठा कमी असल्याने त्या वस्तू काळ्या बाजारात विकल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. एका साध्या मास्कची किंमत देवगड येथील स्थानिक बाजारपेठेत ते 35 रुपये एवढी घेतली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत राज्य सरकार वस्तूची किंमत नक्की करण्याचा अधिकार असून एखादा विक्रेता पेक्षा अधिक किमतीला या वस्तू विकत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. कोरोना संसर्गामुळे एक दहशत निर्माण झाली व मागणी वाढल्याने मास्कच्या किमतीतही वाढ केली आहे.10 रुपयांचा मास्क 35 ते 40 रुपयांपर्यंत विकला जात आहे.
अत्यावश्यक सेवेमध्ये हे भाजीपाला, दूध, किराणा दुकाने, उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी काही वस्तूंची विक्री ही जादा दराने विक्री होत असल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पान टपरी बंद ठेवण्याच्या सूचना असतानाही काही खासगी वाहनांमधून राजरोसपणे गुटखा तंबाखू पुरवठा व विक्री होत असल्याने त्यांच्यावर देखील निर्बंध लादणे तितकेच महत्वाचे आहे, अशी मागणी केली जात आहे.






























































