
सामना प्रतिनिधी । नगर
नगर लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवट दिवस असताना आज घडामोडींना वेग आला. विशेष म्हणजे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी आज शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरुवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक असताना भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान; धनश्री विखे यांनी देखील भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संपूर्ण परिसरात चर्चा रंगू लागल्या होत्या. धनश्री ताईंच्या उमेदवारी अर्जामुळे महायुतीचे विरोधक बुचकळ्यात पडले आहेत.






























































