धर्मापुरी येथे गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर अत्याचार

rape
प्रातिनिधिक फोटो

परळी तालुक्यातील एका महिलेवर गुंगीच्या गोळ्या बळजबरीने खाऊ घालून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना रविवार 25 जुलै रोजी तालुक्यातील धर्मापुरी येथे घडली असून या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आला आहे.

याबाबतीत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करते.

याच असहायतेचा फायदा घेत गल्लीतील 27 वर्षीय युवक अफसर शेख याने 25 जुलै रोजी दुपारी 4 च्या सुमारास पीडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून मारहाण करीत गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून अत्याचार केला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 376, 452, 323 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत. या घटनेने धर्मापुरी परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या