
सामना प्रतिनिधी । नगर
आमच्याकडे सक्षम नेतृत्व असून यंदाची लोकसभा निवडणुक विद्यमान खासदार दिलीप गांधी हेच चौथ्यांदा निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासूनच्या इच्छुकाच्या चर्चेनंतर एक प्रकारे त्यांनी गांधीच्या नावावार शिक्कामोर्तब केले आहे.
पालमंत्री शिंदे म्हणाले, आमच्याकडे सक्षम नेतृत्वा आहे. यावेळीही खासदार गांधी हेच चौथ्यांदा निवडणुक लढविणार आहे. माझ्या अगोदर अनेक इच्छुकही आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. बाहेरुन डोकावणार्यांना आमच्या पक्षामध्ये थारा नाही अशी स्पष्टोक्तीसुध्दा केले. भाजपामध्ये अद्यापर्यंत कोणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही, मात्र, यावेळेला गांधी हेच लढणार आहेत. आमच्याकडे एकाचढ एक उमेदवार आहेत असे सांगून विरोधकांना आमच्याकडे स्थान नाही असे ही ते म्हणाले.



























































