तंबाखूसेवनाच्या दुष्परिणामांविषयी चर्चा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त कुलाब्यातील एचसीजी पॅन्सर सेंटरतर्फे तंबाखूसेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि हे धोके कमी करण्यासाठी काय करावे यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. ‘एचसीजी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुरेष जैन यांच्या उपस्थितीत सर्जिकल आँकॉलॉजिस्ट डॉ. अंकित माहुवकर, हेड अॅण्ड नेक सर्जिकल आँकॉलॉजिस्ट डॉ. प्रशांत पवार आणि सर्जिकल आँकॉलॉजिस्ट डॉ. निनाद काटदरे यांचा या चर्चेत सहभाग घेतला. या चर्चासत्राला सामान्य नागरिक, कॅन्सरवर मात करून बरे झालेले रुग्ण आणि रुग्णांच्या कुटुंबीयांनीही हजेरी लावली. तंबाखूसेवनात हिंदुस्थान जगभरात दुसऱया क्रमांकावर, तर उत्पादनात तिसऱया क्रमांकावर आहे.