
शेतकरी आंदोलनाच्या टुलकिटप्रकरणी प्रकाशझोतात आलेली पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिने अखेर मौन सोडले. माझ्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करण्यात आले असून टीआरपीसाठी मला टीव्ही चॅनेल्सने आरोपी घोषित केल्याची खंत तिने रविवारी व्यक्त केली.
टुलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला 23 फेब्रुवारी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दिशा रवी हिने सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना दिशा रवी म्हणाली की, आपल्याबरोबर जे काही झाले त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याबरोबर काहीच घडलेच नाही असे समजणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे असल्याचे मत तिने व्यक्त केले.
z तिहार जेलमध्ये घालवलेल्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची, प्रत्येक मिनिटाची आणि प्रत्येक सेकंदाची माहिती आपल्याला होती. पर्यावरणाच्या बाबतीत विचार केला म्हणून मोठा गुन्हा झाला की काय? अशी खंतदेखील दिशा रवीने यावेळी बोलून दाखविली.



























































