3 वर्षांच्या आत घटस्फोटाचा निर्णय, अभिनेत्रीच्या आयुष्यात दुसऱ्यांदा आली नवऱ्यापासून वेगळं होण्याची वेळ

divorce

थप्पड चित्रपटामध्ये अभिनय केलेल्या सिद्धांत कर्णिक आणि त्याच्या बायकोने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धांतचं लग्न अभिनेत्री मेघा गुप्ता हिच्याशी झालं होतं. मेघा ही हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री असून तिने शाहरूख खानच्या फॅन या चित्रपटामध्येही काम केलं होतं. CID मालिकेमध्येही तिची भूमिका आहे. मेघा आणि सिद्धांत यांनी 2016 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मेघाचं हे दुसरं लग्न होतं.

घटस्फोटाबाबत अभिनेता सिद्धांत कर्णिक याने बॉम्बे टाईम्सला त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ‘कोणीतरी तुमच्या दंडाला चिमटा काढते आणि चिमटा काढतच राहतं. थोड्यावेळाने तुम्हाला त्याची सवय व्हायला लागते. अचानक तुम्ही वेगळे होता (चिमटा सुटतो) आणि तुम्हाला बरं वाटायला लागतं. तेव्हा तुम्ही विचार करता मानसिक शांती हरवून बसला होता. ही मानसिक शांतता मी हरवून बसलो होतो’ मी आणि मेघाने यावर उपाय करून पाहिले , सगळे प्रयत्न केले मात्र हे सगळे उपाय आणि प्रयत्न वाया गेले असं सिद्धांतने म्हटलं आहे. यामुळे आम्ही वेगळं राहून बघण्याचा निर्णय घेतला. असं केल्याने आमचे बंध अजून घट्ट होतात का हे आम्हाला पाहायचे होते. मात्र वेगळं राहायला सुरुवात केल्यानंतर आम्हाला कळालं की वेगवेगळे राहात असताना आम्ही जास्त सुखी आहोत असं सिद्धांतने सांगितलं आहे. आम्ही एकत्र असताना सुखी नव्हतो असं नाही. मात्र आम्हा दोघांना अजून काहीतरी पाहिजे आणि त्याच्याच शोधात आम्ही होतो असंही तो म्हणाला.

अनेकदा घटस्फोटाची प्रकरणं ही तापदायक ठरतात, सिद्धांतच्या म्हणण्यानुसार त्यांचा घटस्फोट हा तापदायक ठरला नाही. दोघांनीही सामंजस्याने वेगळं व्हायचा निर्णय घेतल्याने असं झाल्याचं सिद्धांतचं म्हणणं आहे. कुटंबाचाही व्यवस्थित पाठिंबा मिळाल्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचंही त्याने सांगितलं. या घटस्फोटामुळे माझं स्वत्व मला कळालं असं सिद्धांतचं म्हणणं आहे. मी सध्या माझ्याच प्रेमात पडलो असून सध्या आनंदी जीवन व्यतीत करत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. मेघा आणि सिद्धांतची ओळख 2015 साली एका पार्टीमध्ये झाली होती. भेटताच क्षणी दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. मेघाचं पूर्वी आदित्य श्रॉफसोबत झालं होतं. मात्र 4 वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या