चाकरमान्यांसाठी खुषखबर, दिवा-सावंतवाडी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाड्या धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने खुषखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी दिवा पॅसेंजर, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, मडगाव-सावतंवाडी पॅसेंजर या गाड्या 7 ते 30 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फेस्टीव्हल स्पेशल गाड्या सोडणार आहे. गेले अनेक दिवस बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या फेस्टिव्हल स्पेशल नावाने 7 ते 30 सप्टेंबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या आरक्षित असणार आहेत. 01501 रत्नागिरी-मडगाव ही गाडी 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 01508/ 01507 मडगाव- सावंतवाडी-मडगाव ही गाडी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 01506/ 01505 ही सावंतवाडी-दिवा गाडी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.