डोंगरीत पालिका कंत्राटदाराची हत्या, आरोपी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंगरी परिसरात आज एका पालिकेच्या कंत्राटदाराची हत्या करण्यात आली. आरोपी हा त्या कंत्राटदाराकडे काही वर्षांपूर्वी कामाला होता. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात कारागृहाची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने आज कंत्राटदाराची हत्या केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

धर्म लिंगाम मद लिंगम (45) असे त्या कंत्राटदाराचे नाव होते. ब्रिजेश कुमार हा मजूर त्याच्याकडे आधी कामाला होता. 2018 साली ब्रिजेशने त्याच्या पत्नीची हत्या केली होती. पत्नीचे लिंगम याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने तो गुन्हा केला होता. त्या गुह्यात अटक होऊन तो कारागृहातदेखील होता. दरम्यान, कारागृहाबाहेर आल्यानंतर त्याने लिंगम याला आज हेरले आणि त्याची चाकूने भोसकून निर्घूणपणे हत्या केली, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. हा प्रकार कळताच जे. जे. मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ब्रिजेशला अटक केली.