‘अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे’, युवकाची थेट लॉर्ड्स वरून मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

अंबाजोगाई जिल्हा व्हावा याची मागणी प्रलंबित असतानाच एका युवकाने थेट क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवरून याची मागणी केली आहे. या मागणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या हातात तिरंगा घेऊन हा युवक ही मागणी करताना दिसत आहे. डॉ. आदित्य पतकराव असे या व्यक्तीचे नाव असून ते मूळचे अंबाजोगाई येथील रहिवासी आहेत.

अंबाजोगाई जिल्हाची मागणी गेल्या काही काळापासून सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनही झाले आहेत. मात्र अंबाजोगाई येथील डॉ. आदित्य पतकराव यांनी थेट इंग्लंड येथूनच जिल्ह्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ क्रिकेट विश्व चषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी काढल्याचा अंदाज आहे. अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा घोषणा देणाऱ्या युवकाची चर्चा सध्या चांगलीच होत आहे.