
अंदमान, निकोबार द्विपसमूहात पोर्ट ब्लेयर जवळ समुद्रात हेरगिरी करणाऱ्या एका चीनी जहाजाला नौदलाच्या युद्धनौकेने हुसकावून लावले. ‘शी यान 1’ असे या जहाचाचे नाव आहे.
पोर्ट ब्लेयरजवळ समुद्रात एक जहाज संशयितरित्या गस्त घालत असल्याचे नौदलाच्या युद्धनौकेने हेरले. त्याची बनावट पाहून ते चीनी जहाज असल्याचे नौदलाच्या निदर्शनास आले. त्यानंतर नौदलाच्या जहाजाने त्याचा पाठलाग करत त्याला समुद्र हद्दीतून हुसकावून लावले.
हिंदुस्थानी नौदलाच्या पाण्यावरील व पाण्याखालील लढाऊ नौकांवर नजर ठेवण्यासाठी ‘शी यान 1’ हे जहाज आले असावे अशी शक्यता नौदलाने व्यक्त केली आहे. हिंदु्स्थानसाठी अंदमान हे महत्वाचे द्विपसमूह मानले जाते. कारण याच द्विपसमुहातून हिंदुस्थानला संपूर्ण देशाच्या व दक्षिण पूर्व आशियाई समुद्रक्षेत्रावर लक्ष ठेवणे नौदलाला शक्य होते.






















































