अभिनेत्री राकुल प्रीत अडचणीत, ईडीचा ससेमिरा मागे लागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
राकुल प्रीत सिंह हिला शूर्पणखेची भूमिका दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे

अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अभिनेत्री राकुल प्रीत सिंग ही सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्यासह 12 सेलिब्रिटींना समन्स बजावले होते.

हे प्रकरण सुमारे चार वर्षं जुनं आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन केल्याचा गुन्हा तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने नोंदवला होता. त्याची चौकशी करण्यासाठी राकुल प्रीत सिंग, राणा दग्गुबाती, रवी तेजा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांसारख्या 12 जणांना ईडीचे समन्स बजावण्यात आले होते.

त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या दिवशी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आलेल्या समन्सनुसार राकुल प्रीत सिंग ईडी कार्यालयात दाखल झाली आहे.

चार वर्षांपूर्वी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सुमारे आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं, मुख्यतः ड्रग तस्कर. त्यापैकी बहुतेक कमी दर्जाचे अंमली पदार्थ तस्कर होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना काही सेलिब्रिटींच्या दिशेने संशयाची सुई होती. त्यानुसार समन्स धाडण्यात आले.