
कोरोना महामारीनंतर जनावरांना लम्पी संसर्गाची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये लाखो मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत असून, आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे. या महामारीपासून बचाव होण्यासाठी श्रद्धेचा भाग म्हणून गुजरातमधील एका गाय मालकाने श्रीकृष्णाला साकडे घातले. यानंतर हा नवस फेडण्यासाठी त्यांनी 25 गाय कच्छडून द्वारकेला 450 किलोमीटर चालत आणल्या. गाईसाठी मध्यरात्री द्वारकाधीश मंदिर उघडल्याने हा निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बऱ्यादचा व्हीआयपी व्यक्तींना ही सुविधा उपलब्ध असते. मात्र चाकांच्या विचार करून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. कच्छच्या महादेव देसाई यांच्या गोशाळेच्या 25 गाईना 2 महिन्यांपूर्वी लम्पी व्हायरस झाला होता. त्यावेळी सौराष्ट्रात लम्पी व्हायरसमुळे शेकडो गाईंचा बळी गेला होता. त्यावेळी महादेव यांनी आपल्या गायी बऱ्या झाल्या तर गाईसह दर्शनाला येईल, असा नवस भगवान द्वारकाधीश यांच्याकडे केला होता. मंदिर प्रशासनापुढे सर्वात मोठी अडचण गाईंना मंदिरात प्रवेश देण्याची होती. कारण, येथे दररोज हजारो भक्तांची गर्दी असते. त्यामुळे गाई मंदिरात आल्यामुळे मंदिराची व्यवस्था बिघडली असती. त्यामुळे मंदिर मध्यरात्री उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. भगवान श्रीकृष्ण गाईचे भक्त होते. त्यामुळे ते रात्रीही त्यांना दर्शन देतील, असा विचार करण्यात आला. त्यानुसार मध्यरात्री 12 वाजता मंदिराची कवाडे उघडण्यात आली. गाईंनी द्वारकेला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम भगवान द्वारकाधीश यांचे दर्शन घेतले. त्यानंतर परिक्रमाही केली. यावेळी मंदिर परिसरात या गाईंच्या स्वागतासाठी अनेक जण होते. मंदिराच्या पुजाऱ्यांनी देवाच्या प्रसादासह या गाईच्या चारापाण्याचीही व्यवस्था केली होती.
20 दिवसांत गाई बऱ्या झाल्या
गाईचे मालक महादेव सांगतात की, भगवान द्वारकाधीश यांच्यावर सर्वकाही सोडून मी गाईच्या उपचारासाठी प्रयत्न केले. काही दिवसांतच गाई बऱ्या झाल्या. जवळपास 20 दिवसांनी सर्वच 25 गाई तंदुरुस्त झाल्या. एवढेच नाही गोशाळेतील दुसऱ्या गाईंनाही लम्पी व्हायरसचा संसर्ग झाला नाही. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर कच्छहून द्वारकेसाठी निघाल्या होत्या.


























































