ई-कॉमर्स कंपन्या देणार 3 लाख हंगामी नोकऱ्या; अॅमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये बंपर भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीत बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला असतानाच ई-काॅमर्स कंपन्यांनी रोजगाराची खूशखबर दिली आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्या सणासुदीत हंगामी तत्त्वावर जवळपास 3 लाख लोकांची भरती करणार आहेत. त्याचबरोबर लॉजिस्टीक कंपन्यांमध्येही रोजगाराची संधी असेल. ई-काॅम एक्प्रेस पंपनीत 30 हजार, तर डिलीव्हरी कंपनीत 15 हजार लोकांना हंगामी नोकरी मिळणार आहे.

कोरोना महामारीत कोटय़वधी लोकांना नोकऱया गमवाव्या लागल्या आहेत. अशातच ई-काॅमर्स आणि लॉजिस्टीक कंपन्यांनी बंपर भरतीचे पाऊल उचलले आहे. सणासुदीत देशाच्या प्रत्येक भागातील ग्राहकांना वेगवान, सुरक्षित सेवा देण्याचे या पंपन्यांचे उद्दिष्ट आहे. ‘रेडसीर’च्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अॅमेझॉन इंडिया हिंदुस्थानातील आपले डिलिव्हरी नेटवर्प नव्या जोशात सुरू करणार आहे. त्याच अनुषंगाने सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधी 1 लाखांहून अधिक लोकांची हंगामी भरती करणार आहे. महामारीत रोजगाराची मोठी विवंचना आहे. या संकटात अधिकाधिक नोकऱया उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्व आहोत, असे अॅमेझॉनच्या ग्राहक सेवा विभागाचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना यांनी सांगितले.

20 टक्के कामगारांना कायमस्वरुपी नोकरी

सणासुदीत ई-काॅमर्स पंपन्यांमध्ये भरती केल्या जाणाऱया 3 लाख कामगारांपैकी 20 टक्के कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार आहे. या कामगारांना सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर कामावरून काढले जाणार नाही. एपूण हंगामी नोकऱयांपैकी 70 टक्के नोकऱया अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन पंपन्यांमध्ये उपलब्ध होणार आहेत. यंदाच्या सणासुदीच्या हंगामात दैनंदिन ऑनलाइन शॉपिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.8 पटीने वाढ होईल, असा ‘रेडसीर’चा अंदाज आहे.