
पृथ्वीला स्वत:भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 24 तास लागतात, हे आपणांस ठाऊक आहेच. पृथ्वीच्या या भ्रमण वेगात बदल झाला आहे. हा बदल गेल्यावर्षी जूनपासून झाला आहे. पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या प्रदक्षिणा वेगात 0.5 मिलिसेकंद इतकी घट झाली आहे. परिणामी कालगणना योग्यप्रकारे होण्यासाठी निगेटिव्ह लिप सेकंद जोडावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
19 जुलै 2020 हा दिवस 24 तासांपेक्षा 1.4602 मिलीसेकंदपेक्षा कमी होता. याआधी सर्वात छोटा दिवस 2005 साली नोंदवला होता. पृथ्वी जेव्हा एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तासांपेक्षा जास्त वेळ घेते तेव्हा असे लीप सेकंद वाढवले जातात. मात्र 2020 मध्ये पृथ्वीने 24 तासांपेक्षा कमी वेळात स्वत:भोवतीची प्रदक्षिणा पूर्ण केल्याने निगेटिव्ह लीप सेकंद जोडावे लागेल काय, याचा विचार शास्त्रज्ञ करत आहेत. 1970 पासून आतापर्यंत असे लीप
सेकंद 27 वेळा वाढवण्याची वेळ आली आहे.
गेल्या 50 वर्षांत पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग थोडा वाढून प्रथमच 24 तासापेक्षा कमी झाला आहे. आता प्रतिदिनी सरासरी 0.5 सेपंदाने दिवस छोटा होत आहे.

























































