कर्ज काढून परदेशात शिका

परदेशात जाऊन शिकण्याचे प्रमाण वाढत आहे. आरबीआयने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवरून हे सिद्ध होत आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांत शैक्षणिक कर्जात झपाटय़ाने वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात विविध बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेणाऱयांची संख्या 20.6 टक्के वाढली आहे. या काळात 110715 कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्ज काढण्यात आले. मागच्या वर्षी हा आकडा 96 हजार 853 कोटी इतका होता. मागील एका वर्षात लोकांनी विदेशी शिक्षणासाठी 40 ते 60 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

अमेरिकेकडे सर्वाधिक कल

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी सर्वाधिक कर्ज घेण्यात आले आहे. अमेरिकन दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 1.40 लाख हिंदुस्थानींना विद्यार्थी व्हिसा जारी करण्यात आला आहे.