सीएच्या इंटरमिडीएटचा निकाल जाहीर, संभाजीनगरचा राजन काबरा देशात पहिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीएआय अर्थात ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’मार्फत मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीएच्या इंटरमिडीएट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात संभाजीनगरचा राजन काबरा हा देशात पहिला आला आहे. त्याने 83.25 टक्के गुण मिळवले आहेत. गुवाहाटी येथील निशथा बोथरा हिने 82.25 टक्के गुण मिळवत दुसरा तर नागपूरच्या कुणाल हरद्वानी याने 80.38 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

सीएच्या इंटरमिडीएट परीक्षेच्या ग्रुप-1 साठी 80, 605 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 10 हजार 717 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 13.30 टक्के इतका लागला आहे. तर ग्रुप-2 साठी 63 हजार 777 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 7 हजार 943 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या ग्रुपचा निकाल केवळ 12.45 टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी निकाल बोथ ग्रुपचा लागला असून त्यासाठी 24 हजार 475 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी केवळ 1 हजार 337 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल 5. 46 टक्के इतका लागला आहे.