एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खडसे यांच्या कारचे टायर फुटून हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात खडसे सुखरुप असून कोणालाही गाडीतील अन्य दुखापत झालेली नाही. याबाबत एकनाथ खडसे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे.

‘आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही’, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

screenshot_2020-11-01-20-21-12-237_com-facebook-katana