आरे मेट्रो कारशेडच्या बांधकामावरील बंदी उठवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरेतील पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणवाद्यांसह शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली. आरेतील जंगल आरक्षित केले. पर्यावरणासाठी शिवसेनेने आरेतील कारशेडचा निर्णय रद्द केला असताना आता शिंदे-फडणवीस सरकारने पर्यावरणाची कसलीही तमा न बाळगता आरे मेट्रो कारशेडच्या बांधकामावरील बंदी उठवली आहे.

कामाचा खर्च, पर्यावरण समतोल, भविष्यातील 17 लाख मुंबईकर प्रवाशांची सोय यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कsला आहे. पर्यावरणाचा पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे.