मिंधे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची वीज कर्मचाऱ्याला ठार मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे गटाचे मंत्री सर्वसामान्यांना धमकावत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता अलिबाग- मुरूडमधील मिंधे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरण अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये महेंद्र दळवी महावितरणच्या अधिकाऱ्याशी अरेरावीची भाषा करत असल्याचे उघडकीस आले आहे.

महेंद्र दळवींनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी मुलाणी यांना फोन करून त्यांच्या हाताखालील मुरूडमधील अधिकारी राठोड यांची बदली करण्याची मागणी केली. त्याचबरोबर “मी शेवटची ताकीत देतो… त्याला सुधारा नाहीतर त्याचा मर्डर अटळ आहे. एकतर त्याची बदली तातडीने करा, नाहीतर मी आमदार म्हणून सांगतो त्याला मारायला. महिना अखेर आहे, त्याची बोली भाषा बरोबर नाही. तू नोकर आहेस मालक नाहिस. माझी इतकीच विनंती आहे की, महिनाअखेर पर्यंत विज बील वसूली थांबवा”, असे दळवी या ऑडिओमध्ये बोलत आहेत.