विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे (83) यांचे आज सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झालेला होता व एक महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

आपल्या कारकीर्दीत प्रारंभी ते पाटबंधारे खात्यात नोकरीला होते. त्यानंतर त्यांनी 35 वर्षे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून सेवा दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सगुणाबाई, मुले अंबादास, देवीदास, राजेंद्र, बाळासाहेब ही 4 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी सायंकाळी पैलास नगर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.