
सामना प्रतिनिधी । लोणावळा
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या निधीतून व मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शिफारशीनुसार, युवा सेना विस्तारक वैभव थोरात यांच्या प्रयत्नातून वेहेरगाव ते आई एकविरा देवी वाहनतळाच्या १५ लाख रूपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या हस्ते झाले.
राज्यमंत्री दादा भूसे यांच्या निधीतून मौजे वेहेरगाव अंतर्गत एकविरा देवी मंदिर घाट रस्ता डांबरीकरण करणे व वाहनतळ सुशोभिकरण करणे आदी कामे मंजूर झाली आहेत. यावेळी महिला आघाडी संघटक शादान चौधरी, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, मा.सभापती शरद हुलावळे, संघटक सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, युवा सेना चिटणीस विशाल हुलावळे, सरपंच सचिन येवले,विभागप्रमुख अनंता हुलावळे, उपविभागप्रमुख यशवंत येवले, शाखाप्रमुख कैलास पडवळ, मधुकर पडवळ, बबन माने, राजू देवकर, काळूराम देशमुख, अविनाश गायकवाड उपस्थित होते.




























































