
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सायंकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.
दिल्ली येथील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाचे आयुक्त सुनील अरोरा पत्रकार परिषद घेणार आहेत. आज निवडणुकांची घोषणा झाली तर तत्काळ आचारसंहिता लागू होईल. महाराष्ट्रात दोन ते तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर देशात आठ ते नऊ टप्प्यात निवडणूक होण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम विधानसभा निवडणुकांची घोषणाही आज संध्याकाळी पाच वाजता होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकाही आजच जाहीर होऊ शकतात.
Election Commission of India to hold a press conference at 5pm today. pic.twitter.com/M8hrrpQBr4
— ANI (@ANI) March 10, 2019



























































