
एलॉन मस्क यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यात अनेक बदल केले आहेत. त्यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे ठेवले. तसेच ब्लू टिक आणि इतर सुविधांसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली. आता एक्सने दोन देशांमध्ये नव्या युजर्सला अंकाउट सुरू करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. एक्सचे रुपांतर पेड सर्विसमध्ये करण्याची योजना असल्याने आता एक्स वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. एलॉन मस्क यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
एक्सवर आता अकाऊंट बनवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मस्क यांनी सांगितले की, एक्स हा पेड प्लॅटफॉर्म बनवण्याची आपली योजना आहे. त्यामुळे आता नवे अकाऊंट सुरू करण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. सध्या फक्त दोन देशांत याची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेला ‘Not a Bot’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या न्यूझीलँड आणि फिलपाईन्स या देशात याची सुरुवात करण्यात आली आहे. या देशात एक्सवर अकाऊंट सुरू करण्यासाठी 1 डॉलर एवढे शुल्क द्यावे लागणार आहे.
Not a Bot योजनेसाठी युजर्सना मोबाईलनंबर व्हेरिफाई करावा लागेल. त्यानंतर कोणत्या प्रकारचे सब्सक्रिप्शन हवे आहे, त्याचा प्लान निवडावा लागेल. या साठी तीन पर्याय आहे. पहिला डॉलर प्लॅन, दुसरा प्रिमियम आणि तिसरा वेरिफाईड ऑर्गेनाइजेशन असे पर्याय आहेत. या तिघांमध्ये डॉलर प्ल२न सर्वात स्वस्त आहे. त्यात आधी मोफत असलेल्या सेवांचा समावेश असेल. कमेट पोस्ट करणे, पोस्ट लाइक करणे, पोस्टवर रिप्लाय करणे, रिपोस्ट , बुकमार्क यासारख्या सुविधा असतील. एक्सचा मोफत वापर करणाऱ्यांना फक्त पोस्ट वाचणे आणि व्हिडीओ पाहणे एवढ्याच सुविधा मिळणार आहेत.
सध्या एक्सचा वापर करणाऱ्या युजर्संना या नव्या योजनेमुळे काहीही फरक पडणार नाही. त्यांना कोणतीही सब्सक्रिप्शन फी द्यावी लागणार नाही. मात्र, या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादावर आणि हा पेड प्लॅटफॉर्म करण्याच्या हेतूने सर्वांसाठी हा नियम लागू झाल्यास आता असलेल्या युजर्सनाही शुल्क द्यावे लागेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही योजना पैसे कमवण्यासाठी नसून युजर्सना चांगली सुविधा देणे आणि स्पॅम आणि बॉट्सची संख्या कमी करणे, हा हेतू असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.






















































