
हिंदुस्थानातील जन्मदरात घट झाली आहे. सध्या हिंदुस्थानचा जन्मदर प्रतिस्थापन पातळीवर गेला आहे. म्हणजे जन्मदर वाढणे थांबले आहे. याबद्दल अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांनी चिंता व्यक्त केली आहे. मस्क यांनी यासंबंधी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून घटत्या जन्मदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हिंदुस्थानातील प्रजनन दर केवळ एका दशकात 2.3 रिप्लेसमेंट लेवलवरून 1.9 वर आला आहे. पोस्टमध्ये मस्क यांनी म्हटले की, हिंदुस्थानची जन्मदर रिप्लेसमेंट लेवल खूपच कमी झाली आहे. हा जन्मदर अनेक वर्षांपासूनच्या रिप्लेसमेंटच्या खाली आला आहे.



























































