
गतविजेता आरसीबीचा संघ पुन्हा एकदा क्वालिफायर-1 च्या सामन्यात सहजपणे दाखल झाला आहे. या लढतीत आरसीबीला सामना करावा लागणार आहे तो गुजरात टायटन्सचा; पण आरसीबीला क्वालिफायर-1 लढतीचा किंग समजले जाते. कारण गेल्या 10 वर्षांत ते दोनदा क्वालिफायर-1 च्या सामन्यात पोहोचले आणि एकदाही ते पराभूत झालेले नाहीत. गेल्या तीन क्वालिफायर 1 सामन्यांत कशी होती आरसीबीची कामगिरी हे आता समोर आले आहे.
आयपीएलमध्ये कधीपासून आला प्ले ऑफचा नियम…
आयपीएल 2008 साली सुरू झाली; पण तेव्हा लीगमध्ये प्ले ऑफचा नियम नव्हता. ही लीग तीन वर्षे प्ले ऑफविना सुरू होती. पण 2011 साली आयपीएलमध्ये प्ले ऑफचा नियम आला आणि पहिल्यांदाच क्वालिफायर 1 हा सामनाही खेळवला गेला.
अपयश ही यशाची पहिली पायरी ठरली…
जेव्हा प्ले ऑफला सुरुवात झाली त्याच 2011 साली आरसीबीचा संघ हा क्वालिफायर-1मध्ये पोहोचला होता. यावेळी आरसीबीपुढे आव्हान होते ते चेन्नई सुपर किंग्जचे. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ भन्नाट फॉर्मात होता. त्यावेळी चेन्नईने आरसीबीला सहा विकेट्स राखून पराभूत केले होते.
आरसीबीने क्वालिफायरचा 1 चा सामना जिंकला, पण…
आरसीबी त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 2016 साली क्वालिफायर 1 मध्ये पोहोचली होती. यावेळी आरसीबीपुढे आव्हान होते ते गुजरात लायन्सचे. गुजरात यावेळी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती, तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर होती. पण आरसीबीने यावेळी गुजरातला क्वालिफायर 1 च्या सामन्यात 4 विकेट्स राखून विजय मिळवता आला होता आणि ते थेट अंतिम फेरीत पोहोचले होते. पण यावेळी त्यांना जेतेपद मात्र मिळवता आले नव्हते.
अखेर आरसीबीने आयपीएल जिंकली…
आरसीबी त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी म्हणजे 2024 साली क्वालिफायर 1 मध्ये दाखल झाली होती. यावेळी आरसीबीचा संघ वेगळ्याच लयीत दिसत होता. आरसीबीच्या संघापुढे यावेळी पंजाब किंग्जचे आव्हान होते. या सामन्यात आरसीबीने एकहाती विजय मिळवला होता. आरसीबीने पंजाबला तब्बल 60 चेंडू आणि 8 विकेट्स राखून पराभूत केले होते. त्यामुळे आरसीबीने हा सामना सहजपणे जिंकला होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आरसीबीने या हंगामात जेतेपदही आपल्या नावावर केले होते.


























































