पर्यावरणवादी निर्मिती करणार ‘द आरे फाइल्स’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मेट्रो-3 या कारडेपो गोरेगाव येथील आरे कॉलनीत उभारण्यावर राज्य सरकार ठाम असल्याने आता यावर पर्यावरणवादी ‘द आरे फाइल्स’ तयार करून यातील घोटाळा उघड करणार आहे. मेट्रोसाठी जमीन घोटाळा झाल्याचा आरोप आरे संवर्धन ग्रुपने केला असून हा ग्रुप लवकरच ‘द आरे फाइल्स’ बनवून त्या माध्यमातून हा घोटाळा उघड करणार आहे. मेट्रो कारशेड डेपोसाठी घोटाळा झाला आहे, असा दावा या ग्रुपने केला आहे.