सरकारवर टीका करणारा माजी जवान मोदींविरोधात निवडणूक लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बीएसएफ जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून सरकारवर टीका करणारा माजी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव हा येत्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार आहे. यादव हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.

‘मी जिंकण्यासाठी निवडणूक लढवत नाही. तर या सरकारची निमलष्करी दलाच्या बाबतीतली धोरणं कशी चुकली आहेत ते दाखवून देण्यासाठी मी निवडणूक लढतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या नावाने मत मागतात पण त्यांच्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना शहीदांचा दर्जा देखील सरकारने दिलेला नाही’, अशी टीका तेज बहादूर यांनी केली आहे.

तेज बहादूर यादव यांनी फेसबुकवरून व्हिडीओ शेअर करत बीएसएफच्या जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाची पोलखोल केली होती. त्यानंतर त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत ते दोषी आढळल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.