
होम आणि हाऊसवेअर उद्योग क्षेत्रात देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेड शोला गोरेगाव येथे आज नेस्कोमधील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरुवात झाली. नवी दिल्लीच्या इटालियन ट्रेड एजन्सीचे ट्रेड कमिशनर-डायरेक्टर अलेसांद्रो लिबेटरी यांनी शोचे उद्घाटन केले. यावेळी भाजप प्रवक्ता अतुल शाह आणि एचजीएच इंडियाचे एमडी अरुण रुंगटा उपस्थित होते. हा ट्रेड शो 16 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. गोरेगावमध्ये जुलै 2023 मध्ये याच ठिकाणी आगामी ट्रेड शोचे आयोजन केले जाणार आहे.

























































