
सामना ऑनलाईन । मुंबई
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक रविवारी ठप्प झाले. जगभरातील युजर्सला फेसबुक अकाऊंट सुरू करायला त्रास झाला. अनेकांच्या स्क्रीनवर एरर मेसेज येत होता. ‘समथिंग वेंट राँग’ आणि ‘ट्राय रिफ्रेशिंग द पेज’ असे संदेश येत होते. युजर्सना प्रोफाइल बघता येतं होतं तरी न्यूज फीड बघता येत नव्हते. त्याचचेळी स्टेटस आणि फोटो, व्हिडीओ मात्र पोस्ट करता येत होते. लाखो युजर्सनी ट्विटरवर याबाबतची तक्रार केली. गेल्या महिन्यातही युजर्सना फेसबुक डाऊनची समस्या सहन करावी लागली होती.




























































