ड्रग्ज कमी घेत जा, चुकीच्या ट्विटमुळे अभिनेता फरहान अख्तर भयंकर ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकाच्या लढतीत बलाढ्य जर्मनीचा अटीतटीच्या लढतीत 5-4 असा थरारक पराभव केला. हिंदुस्थानच्या हॉकी संघाने 1980 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले.

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने मिळवलेल्या या विजयानंतर पंतप्रधानांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच हॉकी संघाचे कौतुक केले आणि त्यांचे अभिनंदन केले. मात्र या दरम्यान अभिनेता फरहान अख्तर याने एक मोठी चूक केली आणि पुरुषांऐवजी महिला संघाचे अभिनंदन करणारे ट्वीट केले. यामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

पुरुष हॉकी संघाच्या विजयानंतर फरहान अख्तर याने उतावळेपणाने एक ट्विट केले. टीम इंडियाच्या महिला संघाच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करत फरहानने चौथे पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. मात्र या ट्विटनंतर तो ट्रोल होऊ लागला. चूक लक्षात येताच फरहानने आपले ट्विट डीलिटही केले, मात्र तोपर्यंत याचे स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Tokyo Olympic ‘सुवर्ण’स्वप्न भंगलं, रवीकुमार दहियाचा अंतिम लढतीत पराभव

एका युजरने फरहानला तू झोपेत ट्विट केलेय काय? असा सवाल केला, तर दुसऱ्याने ड्रग्ज घेऊ नको, असा आगाऊ सल्लाही दिला. तर एका महिला युजरने हे लोक कसे काय लिजेंड खेळाडूंवर बायोपिक बनवतात असा सवाल उपस्थित केला.