
नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याचे जाहीर केले होते. परंतु केंद्र सरकार हे कायदे परत आणू शकतात असे मत राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी ही शक्यता वर्तवली आहे. सरकारने शेतकर्यांना हे कायदे समजवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकर्यांना हे कायदे अमान्य होते. पुढे जर गरज पडली तर हे कायदे परत आणले जाऊ शकतात असे मिश्रा म्हणाले.
#WATCH | Bhadohi: Rajasthan Gov Kalraj Mishra says,”Govt tried to explain to farmers the pros of #FarmLaws. But they were adamant about repeal.Govt felt that it should be taken back&formed again later if needed but right now they should repeal as farmers are demanding…” (20.11) pic.twitter.com/3wHjXYaf2q
— ANI UP (@ANINewsUP) November 21, 2021
मिश्रा म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायद्याबद्दल शेतकर्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे तीनही कायदे मागे घेण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली. सध्या हे कायदे केंद्र सरकारने मागे घेतले आहेत. परंतु उद्या जर गरज पडल्यास हे कायदे पुन्हा आणले जातील असे मिश्रा म्हणाले.
#WATCH | BJP MP Sakshi Maharaj says, “Bills(Farm Laws)have got nothing to do with polls…For PM Modi, nation comes first. Bills come, they’re repealed, they can come back, they can be re-drafted. I thank PM that he chose nation over Bill&dealt a blow to wrong intentions.”(20.11) pic.twitter.com/IIs8QCp4ty
— ANI UP (@ANINewsUP) November 21, 2021
तसेच पंतप्रधान मोदींनी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. कायदे येतात जात, सरकार पुन्हा कृषी कायदे बनवू शकतात असे मत भाजप खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केले.



























































