
सामना प्रतिनिधी, जामखेड
तालुक्यातील बावी (खांडवी)येथील कुंडलिक गंगाराम शिंदे (70) या शेतकऱ्यांने आपल्या घराजवळ शेतात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती जामखेड पोलिस स्टेशनचे चव्हाण यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली त्यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी जाऊन मृतदेहास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
सविस्तर माहिती अशी की, आज दुपारी कुंडलिक शिंदे यांचा मुलगा भास्कर हा घरात झोपला असताना वडील कुंडलिक गंगाराम शिंदे (70) यांनी आपल्या घराच्या मागील बाजूस शेतात जाऊन गळफास घेतला काही वेळाने मुलांनीच ही घटना पाहिली आणि ताबडतोब गावातील लोकांना सांगितले. त्यांनी ताबडतोब पोलीस पाटील जायभाय यांना सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करीत आहेत.

























































