
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये विम्याची अग्रीम 25 टक्के रक्कम ही दिवाळीच्या आत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. शब्दगंध साहित्य परिषदेचे उद्घाटन झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण काका जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
पावसाळा झालेला आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. एक रुपयांमध्ये पिक विमा हा मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे असे विचारल्यानंतर मंत्री मुंडे म्हणाले की, ज्या ज्या मंडळामध्ये 25% पेक्षा कमी, जिथे 21 दिवसाचा खंड पावसाचा पडलेला आहे असे अधिसूचित मंडळ आहेत, याची माहिती घेतली आहे. काही मंडळाच्या संदर्भामध्ये विमा कंपनीच्या अडचणी होत्या, त्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडवल्या असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी विमा कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली, दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम ही दिवाळी आधी त्याची दिली जाईल, असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.


























































