फॅशन पॅशन

199

शिल्पा तुळसकर

आवडती फॅशन…मी ट्रेण्ड अजिबात फॉलो करत नाही. माझा विश्वास आहे की फॅशन कुठलीही चालू असो पण आपल्याला जे शोभतं ते चांगले दिसते तेच घालते. स्वतःचा स्वभाव, आवडी आणि आपला बॉडी टाईप ओळखणे. या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात.

फॅशन म्हणजे...कम्फर्ट

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…मला सलवार -कमिज, साडय़ा आणि जिन्स-लेनिन टॉप आवडतात.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…फॅशन म्हणजे ट्रेण्ड, फॅशन म्हणजे सब्जेक्टिव्ह.

आवडती हेअरस्टाईल?...सुटसुटीत असेल अशी कुठलीही. ज्याने केस चेहऱयावर येणार नाहीत.

फॅशन जुनी की नवी?...जुनं नवं असं काही नाही. छान असेल ते आणि मला छान दिसेल असे काहीही आवडतं.

आवडता रंग?... काळा आणि पांढरा, राणीकलर.

तुमच्या जवळच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते?…माझ्या नवऱयाला माझं साधं राहणीमान आवडतं.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?... खूप. मी अजिबात ब्रॅण्ड कॉन्शिअस नाहीय, पण कपडे निवडताना कपडय़ाचा दर्जा बघूनच घेते. रस्त्यावर अनेकदा चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळू शकतात. ही शॉपिंग करताना एक मज्जा असते. कॉलेजच्या दिवसांची आठवण येते. पण कपडय़ांची प्रदर्शन भरतात तेव्हा तिथून शॉपिंग करायला जास्त

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?…फुटवेअर.

ज्वेलरी काय आवडते?... डायमण्ड, मोती, सिल्व्हरमध्ये झुमके.

आवडता ब्रॅण्ड... ऍण्ड, सब्यसाची

फॅशन फॉलो कशी करता?…अजिबात कुठे वाचून बघून मी फॅशन फॉलो करत नाही. मला जे पटेल वाटेल तेच मी घालते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?...मी अपडेट राहण्यासाठी काही वेगळं करत नाही. मी सुधा मूर्तींचे एक प्रिंसिपल फॉलो करते जर तुम्ही चार नवीन कपडे घेतले तर तुम्ही चार कपडे कपाटातले डोनेट करायला हवेत. जे मी आवर्जून करते. माझा जुन्याकडे जास्त कल आहे.

ब्युटी सिक्रेट…माझे आनंदी व्यक्तिमत्त्व आहे. खूप वेळ कुठल्याही गोष्टीत मी बुडून राहत नाही. अनेक गोष्टी मनाला लावून घेते पण चाळिशीनंतर त्यातून बाहेर पडायला शिकले.

माझ्या चांगली त्वचा आणि आतून आनंदी असणे या दोन गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात.

टॅटू काढायला आवडेल का? मी तीन टॅटू काढले आहेत. टॅटू माझ्या नवऱयाने काढला होता, त्यानंतर सहा वर्षाने मी माझ्या हातावर काढला.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी... सनस्क्रीन, परफ्युम, लिपस्टिक.

फिटनेससाठी... सतत कार्यशील असणे किंवा नियमित चालायला जाणे. आता मी स्विमिंग शिकतेय.

आपली प्रतिक्रिया द्या