बंद पडलेल्या गिट्टी खदानीतील मातीचा ढिगारा कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrapur-mine

बंद पडलेल्या गिट्टी खदानीतील मातीचा ढिगारा कोसळून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नंदोरी गावात घडली. रामचंद्र जंगेल (47) आणि योगेश जंगेल (26) अशी मृतकांची नावे असून हे दोघेही नांदोरी गावचे रहिवाशी होते.

ही बंद पडलेली गिट्टी खदान नंदोरी गावाजवळ आहे, खदानीजवळ असलेल्या एका गिट्टी क्रशर वर काम करणारे हे बाप-लेक काल संध्याकाळी मासेमारी करण्यासाठी खदाणीत गेले होते, मात्र ते बसले होते तो मातीचा ढिगारा अचानक कोसळल्याने दुर्घटना घडली, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली.
मृतदेहांचा शोध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घेत आहेत.