दिल्ली हादरली! नराधम बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार, पाच वर्षांपासून सुरू होते अत्याचार

दिल्लीमध्ये वडिल- मुलीच्य़ा नात्याला काळीमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका मुलीवर तिच्याच वडिलांनी गेली 5 वर्ष सातत्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बलात्कारामुळे ती मुलगी गरोदर देखील राहिली होती त्यावेळी या नराधमाने तिचा गर्भपातही केला होता. स्वत: मुलीने याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

रामप्रकाश गौतम असे त्या नराधमाचे नाव असून तो गाजियाबादचा रहिवाशी आहे. रामप्रकाश गेल्या 5 वर्षांपासून त्याच्या स्वत:च्या मुलीवर बलात्कार करत होता. आपल्या मुलीने घराबाहेर पडू नये, याबाबात बाहेर कोणाला सांगू नये यासाठी त्याने तिचे केस देखील कापले होते. अनेकदा बलात्कार झाल्यामुळे तिला गर्भधारणा झाली होती. मात्र मुलगी गरोदर असल्याचे जर घरच्यांना समजल तर आपलं बिंग फुटेल या विचाराने त्य़ाने मुलीचा गर्भपात देखील केला.

पीडित मुलगी तिच्या वडिलांच्या या घाणेरड्या वृत्तीला कंटाळली होती. तिला या जाचातून बाहेर पडायचे होते. यासाठी तिने घराबाहेर पडायचे ठरवले. 16 एप्रिल 2024 रोजी मुलगी वडिलांची नजर चुकवून त्यांच्याा तावडीतून कशीतरी सुटली. ती संपूर्ण रात्र तिने रेल्वे स्थानकावर काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाझियाबाद येखील न्यायालयात पोहोचली. तिथे तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार देखील दाखल केली. त्यानंतर तिच्या वडिलांना अटक करण्यात आली.

भाऊ व इतर नातेवाईकांविरोधातही गुन्हा दाखल

सदर पीडिता ही तिचे वडिल व भावासोबत राहायची. भावाल देखील या सर्व प्रकाराची माहिती होती मात्र त्याने देखील पीडितेची मदत केली नाही.  वडिलांविरोधातील पुराव्यासाठी मुलीने बलात्काराचा व्हिडीओ बनवून नातेवाइकांना दाखवला, मात्र ते सर्वजण देखील गप्प राहिले असे तिने न्यायालयात सांगितले. त्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी आरोपी वडिल तसेच मुलीचा भाऊ, काका आणि मामाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.