फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बँका बंद? वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेब्रुवारी महिन्यात जवळपास 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने काढलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार विविध राज्यांमधील आणि प्रांतांमधील सुट्ट्या तसंच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील.

अर्थात दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसंच सर्व रविवारी बँका नेहमीप्रमाणे बंद असतील. काही प्रांतवार सण उदा. वसंत पंचमी आणि गुरू रविदास जयंती या दिवशी देशातील काही भागांमधील बँका बंद राहतील.

अर्थात रिझर्व्ह बँकेची ही यादी संपूर्ण देशभराची असून यातील काही सुट्ट्या महाराष्ट्राती बँकाना लागू नसतील. त्यामुळे त्या दिवशी बँका सुरू राहतील. याची सुरुवात 2 फेब्रुवारीपासून होईल.

वाचा सुट्ट्यांची यादी –

फेब्रुवारी 2 – सोनम ल्होछार (गंगटोक)
फेब्रुवारी 5 – सरस्वती पूजा / श्रीपंचमी / वसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता)
फेब्रुवारी 6 – पहिला रविवार
फेब्रुवारी 12 – दुसरा शनिवार
फेब्रुवारी 13 – दुसरा रविवार
फेब्रुवारी 15 – मोहम्मद हजरत अली जयंती (इम्फाळ, कानपूर, लखनौ)
फेब्रुवारी 16 – गुरू रविदास जयंती (चंदिगढ)
फेब्रुवारी 18 – डोलीजत्रा (कोलकाता)
फेब्रुवारी 19 – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्र)
फेब्रुवारी 20 – तिसरा रविवार
फेब्रुवारी 26 – चौथा शनिवार
फेब्रुवारी 27 – चौथा रविवार