फेडररचे नवव्या विम्बल्डन जेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

आठ वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम करणाऱ्या स्वित्झरलंडच्या रॉजर फेडररने यंदाच्या स्पर्धेतही पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. सोमवारी त्याने फ्रान्सचा बिगरमानांकीत खेळाडू एड्रियन मानारिनोला सरळ सेट्समध्ये ६-० , ७-५ , ६-४ असे पराभूत केले.  सुपरस्टार फेडररची विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही १६ वी वेळ आहे. या विजयाने रॉजरने नवव्या विम्बल्डन जेतेपदाकडे दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. उपांत्यपूर्व फेरीत फेडररला फ्रान्सचा गाएल मोनफिल्स आणि दक्षिण आफ्रिकेचा केविन अँडरसन यांच्या लढतीतील विजयी खेळाडूंशी झुंजावे लागणार आहे.

३६ वर्षीय फेडररने ५३ वेळा ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. मोनफिल्सविरुद्ध फेडररचा विजयी रेकॉर्ड ९-४ असा तर अँडरसनविरुद्ध ४-० असा आहे.